Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

विवाहाच्या संकेतस्थळावरून ओळख वाढवत रशियात नोकरी करत असल्याची बतावणी; संगणक अभियंत्या तरुणीला लाखोंचा गंडा

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २५ वर्षीय तरुणी सध्या वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात असलेल्या एका खासगी वसतिगृहात राहायला आहे. ती माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. फेब्रुवारी महिन्यात आरोपीने तरुणीशी संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याने तरुणीकडे विवाहाबाबत विचारणा केली. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने रशियातील माॅस्को शहरात नोकरी करत असल्याची बतावणी तरुणीकडे केली.

तरुणीला त्याने जाळ्यात ओढले. त्याने तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणी आणि आरोपींमध्ये संवाद वाढला. ते मोबाइलवरुन एकमेकांशी नियमित संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी आरोपीने छातीत दुखत असल्याची बतावणी तरुणीकडे केली. ‘माझा पगार झाला नाही. तातडीने पैशांची गरज आहे’, असे सांगून तरुणीला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. तरुणीने शहानिशा न करता आरोपीच्या बँक खात्यात चार लाख ३५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद करुन तरुणीशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल धस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×