Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरीचे आश्वासन देत लाखोंचा गंडा

marathinews24.com

पुणे – मुलाला पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची साडेअकरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश रोहिदास जाधव (रा. पिंपरी-चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपीने तक्रारदाराच्या मुलाला पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी साडेअकरा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून दिली नाही. त्यामुुळे त्यांनी आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली. आरोपीने त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यानंतर आरोपीने त्यांना ५० हजार रुपये परत केले. उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे दिली. सहायक पोलीस निरीक्षक कांगणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×