Breking News
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरणAjitdada Pawar Krishi Samruddhi Loan Scheme : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभनिधीअभावी डीपी रोडवरील कामे रखडू देऊ नयेत!;  चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्पष्ट सूचनापुण्यात घोरपडी, पेठ पोलीस चौकीजवळ गोळीबार; तरुण जखमीडिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

पुण्यात घोरपडी, पेठ पोलीस चौकीजवळ गोळीबार; तरुण जखमी

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

संशयित हल्लेखोर ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील घोरपडी पेठ पोलिस चौकीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत ख्वाजा उद्दीन नाजीर शेख ऊर्फ नुरू शेख हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या पाठीला गोळी लागली असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल सुनील परदेशी आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून घोरपडी पेठ परिसरात आले होते. त्यांनी नूर शेख याच्यावर तीन राऊंड झाडले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, ही घटना पोलिस चौकीच्या जवळच घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित हल्लेखोर सुजल सुनील परदेशी याला पळून जात असताना ताब्यात घेतले.

त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. जखमी नूर शेख हा पुण्यातील गणेश पेठ परिसरात राहणारा आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत. पूर्व वैमानस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिसांकडून सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×