Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूक

Digital Gold Investment Fraud Pune

‘डिजिटल गोल्ड’च्या नावाखाली व्यावसायिकाला ९४.४० लाखांचा सायबर गंडा

marathinews24.com

पुणे – ‘डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५५ वर्षीय व्यावसायिक हे कल्याणीनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष चोरट्यांनी त्यांना सांगितले. गुंतवणूक योजना, तसेच परताव्याबाबत चोरट्यांनी त्यांना माहिती देऊन जाळ्यात ओढले. पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी गेल्या सात ते आठ महिन्यात त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले. तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ९४ लाख ४० हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×