Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांंचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातातंत पाच जणांचा मृत्यू झाला. बेदरकारपणा, वाहतूक नियमाचे उल्लंघन, नियमभंग अवजड वाहतूक केल्यामुळे अपघात घडले असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततच्या वाढत्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले असून, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार – सविस्तर बातमी

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र अनंत जोशी (वय ८०, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) हे ठार झाले आहेत रोहित जोशी (वय ५३) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रवींद्र जोशी हे १६ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करत आहेत.

उत्तमनगर-खडकवासला रस्त्यावरील कुडजे गावाजवळ भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विवेक विनोद मोहरीर (वय ४४) असे मृत्यमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शीतल (वय ४२, रा. गावकुस रिसोर्ट, जांभळी, सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार विवेक हे २९ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार विवेक यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक पालवे तपास करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला भागात नुकतीच घडली. मोहम्मद गुलजार सिद्दीकी (वय ४७, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सिद्धीकी यांचे चुलतभाऊ सिंकदर शफी सिद्दीकी (वय ६४) यांनी नांदंडे सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार मोहम्मद सिद्दीकी हे २४ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास खडकवासला परिसरातून निघाले होते. स्मशानाभूमीजवळील अरुंद रस्त्यावर समोरुन येणााऱ्या भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार मोहम्मद यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस फौजदार भापकर तपास करत आहेत.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे भागात घडली. सुमीत राजेश राठोड (वय १७, रा. अभिनव काॅलेजजवळ, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राठोड याची आई अनुसया (वय ४२) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुमीत हा ११ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नऱ्हे परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सुमीत याला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातास जबबादार ठरल्याप्रकरणी वाहनचालक, तसेच सुमीत अल्पवयीन असताना त्याला दुचाकी वापरास देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरकुळे तपास करत आहेत.

जु्न्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अनिल लक्ष्मण वाघमारे (वय ४५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुशीला (वय ४२) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिल वाघमारे हे १६ जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बोपोडी चौकातून निघाले होते. त्या वेळी अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अवजड वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गालफाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×