Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुण्यात नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद

पुण्यात नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद

वाहतूक पोलिसांकडून नदीपात्रातील रस्ता बंद; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद केला. खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळनंतर संततधार पाऊस झाला. पाऊस झाल्यानंतर धरणातून विसर्ग करण्यात आला. शनिवारी दुपारी विसर्ग वाढविण्यात आला.

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक – सविस्तर बातमी 

नदीपात्रातील रस्ता, तसेच बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. नदीपात्रातील रस्त्याचा वापर नारायण पेठ, शनिवार पेठ, तसेच कोथरूडकडे जाणारे वाहन चालक करतात. नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. नदीपात्राकडे जाणारे रस्ते वाहतूक पोलिसांनी लोखंडी कठडे टाकून बंद केले. नदीपात्रातील रस्त्याचा वापर वाहनचालकांनी करु नये. पाणी ओसरल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला जाईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.

खडकवासला धरणसाखळीतून मोठ्या प्रमाणवर सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

डेंगळे पुलाखाली अडकलेल्या युवकाची सुटका

खडकवासला धरणातून माेठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्यानंतर पाणी पातळीत वाढ झाली. शिवाजीनगर भागातील डेंगळे पुलाखाली चेंबरजवळ अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाने सुटका केली. नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर डेंगळे पुलाखाली असलेल्या चेंबरजवळ एक युवक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी अडीचच्या सुमारास मिळाली.

कसबा पेठ अग्निशमन केंद्रातील समीर शेख, समित दळवी, गणेश लोणारे, प्रसाद नाणेकर, संतोष अरगडे, प्रतीक कुंभार, आतिश नाईकनवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरी, शिडी, तसेच लाईफ जॅकेट अशा साधनांचा वापर करुन जवान खाली उतरले. शिवाजीनगर भागातील जीवरक्षक राजू काची हे बचाव कार्यात सहभागी झाले. पंधरा ते वीस मिनिटांत नदीपात्रात अडकलेल्या युवकाची सुटका करण्यात आली. २२ वर्षीय युवक नदीपात्रात कसा अडकला, याबाबतची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×