Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुणे स्टेशन परिसरात महिलेचे दागिने लांबविले

पुणे स्टेशन परिसरात महिलेचे दागिने लांबविले

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा

marathinews24.com

पुणे – स्टेशन परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेकडील ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला या ताडीवाला रस्ता भागात राहायला आहेत. त्या ३० जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास ससून रुग्णालयासमाेरील रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी महिलेकडे बतावणी केली. या भागात दागिने लांबविण्याच्या घटना घडतात, अशी बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी महिलेला पाकिटात दागिने ठेवण्यास सांगितले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिने ठेवलेले पाकिट हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरीला

पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगावच्या रहिवासी आहेत. त्या २९ जुलै रोजी सायंकाळी पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीत कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील ४५ हजार रुपयांची सोन्याची बांगडी कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×