भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
marathinews24.com
पुणे – भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख आठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली.याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात राहायला आहेत. ३१ जुलै रोजी सदनिका बंद करुन ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास घराबाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेले तीन लाख आठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. तासाभरानंतर तक्रारदार घरी पोहोचले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेल्याचे घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
























