Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

लष्कर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्यात मोटार थांबविल्यानंतर दरवाजा अचानक उघडल्याने दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लष्कर भागात घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोटार चालक महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

एसटी प्रवासी महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

सूर्यकांत लक्ष्मण बिडकर (वय ४२, रा. गवळी वाडा, बुटी स्ट्रीट, लष्कर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक महिला श्रृती जयेश गुजर (वय ३० ,रा. साचापीर स्ट्रीट, लष्कर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश गणेश चवंडके (वय २५, रा. गवळी वाडा, बुटी स्ट्रीट, लष्कर ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बिडकर हे ३० जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बुटी स्ट्रीट परिसरातून निघाले होते. क्वार्टर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार चालक महिलेने मोटार थांबविली. तिने अचानक दरवाजा उघडला. मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्यानंतर दुचाकीस्वार बिडकर हे दरवाज्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला, तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या बिडकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×