बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – गावठी दारु विक्री करणाऱ्या महिलेला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून गावठी दारू जप्त करण्यात आली. शीतल सुरेंद्र राठोड (वय २६, रा. कंजारभाट वस्ती, गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल खाडे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदाशिव पेठेत तरुणाचा मोबाइल हिसकाविला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल राठोड ही गंगाधाम रस्त्यावरील मोकळ्या जागेत गावठी दारुची (हातभट्टी) विक्री करत असल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. गावठी दारुत विषारी रासायनिक पदार्थ मिसळून ती गावठी दारूची विक्री करत असल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करत आहेत.
























