Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

सदाशिव पेठेत तरुणाचा मोबाइल हिसकाविला

लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून अंगठी चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात बुलेट चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील आहे. सध्या तो लोकमान्यनगर परिसरात राहायला आहे. १ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास तो सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलिसांनी ज्ञानप्रबोधिनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या चाेरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार शेंडजाळे तपास करत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या तरुणाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सारसबाग परिसरातून शनिवारी (१ ऑगस्ट) मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ गर्दीत तरुणाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सेानसाखळी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×