मद्यधुंद पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पोलीस व्हॅनने चार वाहनांना धडक दिल्याची घटना सदाशिव पेठेतील देशमुखवाडीत नुकतीच घडली. याप्रकरणी मद्यधुंद पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गोखले राज्यशास्त्र संस्थेतील सुरक्षारक्षकाला मारहाण ? – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील देशमुखवाडी परिसरातून शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास व्हॅन निघाली. अरुंद गल्लीत व्हॅनचालकाचे नियंत्रण सुटले. दोन मोटारी, एक टेम्पो, तसेच दुचाकीला व्हॅनने धडक दिली. शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त शहरात दिवसभर बंदोबस्त तैनात केला होता. मोटार परिवहन विभागातील व्हॅन टिळक रस्ता परिसरात आली होती. त्यावेळी टिळक रस्त्यावर कोंडी झाली होती. कोंडी टाळण्यासाठी खैरे याने देशमुखवाडीतील गल्लीत व्हॅन नेली. व्हॅनच्या धडकेत काही वाहनांचे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर देशमुखवाडीतील अरुंद गल्लीतून व्हॅन भिकारदास मारुती मंदिराकडे नेण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी व्हॅनचालक खैरे याला ताब्यात घेतले.
‘व्हॅनचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मोटार अधिनियम कायदा, तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.
























