Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

गोखले राज्यशास्त्र संस्थेतील सुरक्षारक्षकाला मारहाण ?

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा सुरक्षारक्षकाशी वाद

marathinews24.com

पुणे – गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या आवारात मोटार लावण्यावरुन झालेल्या वादातून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूलासह काडतूस जप्त – सविस्तर बातमी

निवृत्त पोलीस अधिकारी भानूप्रताप बर्गे हे रविवारी (२ ऑगस्ट) रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गोखले संस्थेच्या आवारात त्यांची मोटार लावण्यासाठी गेले होते. त्या वेळी वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याचे सुरक्षारक्षकाने त्यांना सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून मारहाणीची घटना घडली. या घटनेचे चित्रीकरण आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली.

गोखले संस्थेतील सुरक्षारक्षक सत्यवीर सिंग याने शिवीगाळ करुन धक्काबुक्की, तसेच धमकी दिल्याची तक्रार बर्गे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बर्गे यांनी समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केली. सुरक्षारक्षकाने गैरवर्तन करुन धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरमयान, या प्रकरणात गोखले संस्थेकडून अधिकृत खुुलासा देण्यात आला नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×