Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

सिंहगड रस्त्यावर तरुणाचा खून; पसार झालेले अटकेत

गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून आरोपींना अटक

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाचा खून करुन पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुजीत सोमनाथ धुतावळे (वय १९), आशिष राजू सोनवणे (वय १९, दोघे रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नदीपात्रात अडकलेला तरुण बचावला – सविस्तर बातमी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी रात्री काढण्यात आलेली मिरवणूक पाहून शुभम राजू घोडके (वय २२) आणि त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२) हे रिक्षातून सिंहगड रस्ता परिसरातून निघाले होते. पानमळा परिसरात आरोपींनी सुजीत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मेहुण्याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता. पसार झालेले आरोपी सिंहगड रस्ता, तसेच पद्मावती परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, संदीप शिर्के यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून पसार आरोपी धुतावळे, सोनवणे यांच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपींना पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, कुंदन शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×