चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कात्रज गावठाणात घडली.याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्यावर तरुणाचा खून; पसार झालेले अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कात्रज गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या श्रीनाथ सृष्टी सोसायटीत राहायला आहेत. २ ऑगस्ट रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय हे सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यंनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
























