Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश

राजकारण, शिक्षण आणि समाजसेवेत डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अविस्मरणीय

marathinews24.com

पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश – सविस्तर बातमी

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. डी. वाय. पाटील हे प्रामाणिक, अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकाभिमुख नेतृत्व लाभलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. राजकारण, शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला. महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली. शिक्षणाचा व्यापक विस्तार घडवून आणण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.

राजकीय जीवनात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारीने सेवा बजावली. शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे प्रतिभाताई पाटील यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या दीर्घ सहवासाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्यांची साधेपणा, माणुसकी आणि कार्यनिष्ठा नेहमीच प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदृष्टी असलेला शिक्षणप्रेमी, अनुभवी राजकारणी आणि समाजसेवक गमावला असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही. शेवटी, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थना प्रतिभाताई पाटील यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×