Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश

डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश

marathinews24.com

पुणे – पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांनी नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत कांबळे जनहिताचे काम करतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

सामाजिक, पर्यावरणीय तसेच जनहिताच्या विविध विषयांवर पद्मा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची गरज असल्याची भावना श्री. शशिकांत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व जनहिताच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“समाजसेवेचा अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संपर्क याचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला तसेच पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनहितासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे,” असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×