Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

तब्बल १० लाख रूपये पाठवायला सांगून केली फसवणूक

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्यावसायिकाच्या कार्यालयातील मोबाइलवर मेसेज पाठवून सायबर चोरट्याने तब्बल १० लाख रूपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली आहे. ही घटना २७ ते ३१ जुलैला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडीत राहणार्‍या ५८ वर्षीय व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बुलेट रायडरांना मस्ती करणे भोवले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून, त्यांचे विश्रामबाग परिसरात कार्यालय आहे. २७ जुलैला सायबर चोरट्याने संबंधिताच्या कार्यालयातील मोबाइलवर मेसेज पाठवला. संबंधित मेसेज व्यावसायिक करीत असल्याचे भासवले. त्यानंतर सायबर चोरट्याने कार्यालयातील कामगाराला ऑनलाईनरित्या १० लाख रूपये तत्काळ पाठवण्यास सांगितले. त्यानुसार ही रक्कम पाठवण्यात आली. मात्र, व्यावसायिकाने पैसे कोणालाही पाठवण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक लाहिगुडे तपास करीत आहेत.

बँकखात्यात स्वीकारली फसवणूकीतील रक्कम

सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यातील रक्कम बँकखात्यात स्वीकारल्याप्रकरणी बँकखातेधारकाविरूद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशभरातील सायबर फसवणूकीतील १० लाख ३१ हजारांची रक्कम संबंधित बँकखात्यात वर्ग केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अमलदार सुवर्णा जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×