Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडले

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या

आप्पा बळवंत चौकात वाहतूक पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – ठाणे शहरात एकाची ९३ लाख रुपयांची फसवणूक करुन पसार झालेल्या दोघांना वाहतूक पोलिसांनी आप्पा बळवंत चौक परिसरात पकडले. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना वाहतूक पोलिसांनी ठाणे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

येरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरण – सविस्तर बातमी

अक्षय संजय तांबे (वय २२), ओंकार विष्णू शिरसाठ (वय २४, दोघे रा. ठाणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात तांबे आणि शिरसाठ यांच्याविरुद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाेघांनी एकाची ९३ लाखांची फसवणूक केली होती. कोपरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत होता. आरोपी आप्पा बळवंत चौक परिसरात असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग शाखेतील सहायक निरीक्षक म्हात्रे यांना कळविण्यात आली.

पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक म्हात्रे, हवालदार खरात, गौड पोलीस शिपाई शेख, कानवडे, प्रधान यांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघे जण ठाणे शहरातील फसवणुकीच्या गु्न्ह्यात फरार असल्याचे निष्पन्न झाले. तांबे आणि शिरसाठ यांना तपासासाठी कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून कळविण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×