Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

परदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्री

देहविक्रय करण्यास दबाब टाकल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – परदेशात नोकरीचे आमिष दाखवून नागपूरमधील एका महिलेची पोर्तुगालमध्ये विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला पोर्तुगालमध्ये देहविक्रया करण्यास दबाब टाकला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – सविस्तर बातमी

महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळची नागपूरमधील आहे. तक्रारदार महिला समाज माध्यमातून आरोपींच्या संपर्कात आली होती. नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन या देशांत दरमहा दीड लाख रुपये मासिक वेतन असलेली नोकरी मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. महिला आरोपींना पुण्यात भेटली. त्यानंतर महिलेकडून आरोपींनी टप्याटप्याने ११ लाख रुपये घेतले. मे महिन्यात तिला स्पेनमार्गे पोर्तुगालमध्ये पाठविण्यात आले. तेथे पोहोचताच महिलेचे पारपत्र ताब्यात घेतले. महिलेला एका मद्य विक्री दुकानात कामाला लावले.

मद्य विक्री दुकानाच्या मालकाने महिलेला तूला मी पैसे देऊन विकत घेतले आहे, असे सांगितले. त्यानंतर मद्य विक्री दुकानाच्या मालकाने महिलेवर देहविक्रय करण्यासाठी दबाब आणला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने पतीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मालकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन ती पोर्तुगालमधून स्पेनमध्ये आली. तेथून ती दिल्लीत आली. दिल्लीत पोहोचल्यानंतर महिलेचा पती तेथे पोहोचला. महिला आणि तिचे पती नागपूरला आले.महिलेची फसवणूक पुण्यात झाल्याने तिने नुकतीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×