Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

डॉक्टरांवरील हल्ले, खोट्या तक्रारींना आळा घालण्याची मागणी

marathinews24.com

पुणे – डॉक्टरांवर गेल्या काही दिवसांत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सतत हल्ले, पोलिस तक्रारी यांसारखे काही ना काही होत आहे. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात – सविस्तर बातमी

डॉक्टरांना न्याय मिळावा, खोट्या तक्रारींना आळा बसावा आणि वैद्यकीय व्यवसायाला संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर हे समाजाचे रक्षक आहेत. मात्र त्यांच्याविरोधातच अनेकदा धमक्या, मारहाण, पोलीस तक्रारी, दवाखान्याची तोडफोड अशा घटना घडतात. यामुळे डॉक्टरांचा मानसिक छळ होतो आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. याकडे शासकीय यंत्रणेने वेळीच लक्ष द्यावे यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सचे मुख्य समन्वयक उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. शिवराज पाटील, डॉ. मंदार सावजी, डॉ. संतोष तळेकर, डॉ. अतुल सोनावणे, डॉ. समीर बदामी, डॉ. सिद्धार्थ शिंदे, रुग्ण हक्क परिषदेच्या अपर्णा मारणे साठे यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.

यावेळी संघटनेने डॉक्टरांवरील हल्ले, अत्याचाराविरोधात तत्काळ कठोर कारवाई करावी, डॉक्टरांविरोधात तक्रार असेल तर पोलीसांनी चौकशीपूर्वी त्यांना आरोपी किंवा गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, डॉक्टरांचा सन्मान राखला जावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात यावे या मागण्या प्रामुख्याने मांडल्या. डॉक्टर, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन यांच्यात नियमित समन्वय बैठक आयोजित करावी, जिल्हास्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी समन्वय समिती स्थापन करावी, यांसारख्या मागण्या करण्यात आल्या.

उमेश चव्हाण म्हणाले, “डॉक्टर सुरक्षित असतील, तरच समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतात. त्यामुळे आम्ही केलेल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. डॉक्टरांनी जर काम करणे बंद केले तर समाजाचे जगणे अवघड होईल. त्यामुळे त्यांचा माणूस म्हणून विचार व्हायला हवा. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी शांतपणे गोष्टी समजून घेऊन, डॉक्टरांशी योग्य पद्धतीने संवाद साधायला हवा. जेणेकरुन डॉक्टरांना त्यांचे काम करता येईल आणि समाजातील कोणत्याच घटकाला त्रास होणार नाही.”

डॉ. अवसाफ यांनी डॉक्टरांची बाजू मांडताना रुग्ण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात. मात्र तेही माणूस असतात हे लक्षात घेत नाहीत. कोणताही डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो. पण आरोग्याच्या तक्रारी हाताबाहेर जातात, तेव्हा डॉक्टरांकडेही काही पर्याय उरत नाही, हे रुग्णांनी समजून घ्यायला हवे. अनेकदा विनाकारण डॉक्टर, हॉस्पिटल यांना बदनाम केले जाते. याचा डॉक्टरांना तर ताण होतोच. पण पोलीस, प्रशासन, कायदा व्यवस्था या सगळ्यांवरच याचा ताण येतो.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×