Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

एआयच्या मदतीने तयार केलेल्या बनावट चित्रफितीला बळी पडून ज्येष्ठ महिलेने गमावले ८ लाख रुपये

marathinews24.com

पुणे – केंद्रीय अर्थमत्री निर्मला सीतारामन यांची बनावट चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करुन फसवणूक करण्याची आणखी एक घटना उघडकीस आली. सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाेळीबार करुन २२ तोळ्यांचे दागिने लुट; दरोडेखोर उज्जेैनमधून अटकेत – सविस्तर बातमी

केंद्र सरकारच्या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविणारी चित्रफीत सायबर चोरट्यांनी समाज माध्यमात प्रसारित केली होती. कोथरूड भागातील गुरुगणेशनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने ही चित्रफीत पाहिली. त्यानंतर चित्रफितीतील सायबर चोरट्यांच्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात ८ लाख रुपये जमा केले. दरम्यान, संबंधित चित्रफीत कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करुन तयार केल्याचे उघडकीस आले. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

अशा प्रकारे सायबर चाेरट्यांनी शहरातील एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×