Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक, तसेच विमाननगर परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. बोपोडी पुलाजवळ पीएमपी बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (७ जुलै) दुपारी चारच्या सुमारास घडली. निर्मला नरेश पिल्ले (वय ५७) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांची मुलगी प्रीती आकाश मूर्ती (वय ३२, रा. गाडीअड्डा, खडकी बाजार) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास बोपोडी पूल परिसरातून निघाल्या हाेत्या. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत.

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील विमाननगर परिसरात भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अपघातात महिलेचा दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला. याप्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीता गणपत काटे (वय ५४) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात सुनीता यांचा मुलगा करण (वय २०) हा जखमी झाला. याबाबत काटे यांचा भाऊ सुनील मारुती नागवडे (वय ४७, रा.श्रीकृष्णनगर, पिंपळे गुरव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण काटे आणि त्याची आई सुनीता हे पुणे-अहिल्यानगर रस्त्याने वाघोलीकडे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी विमाननगर परिसरात भरधाव पीएमपीने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर सुनीता काटे या रस्त्यावर पडल्या. पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पीएमपी चालक पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×