Breking News
हडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाहीपुण्यात ऐरोस्पेस मॉलमधील बारमध्ये रात्रभर डांगडिंग‘स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम…’दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या नावे ‘डीपफेक व्हिडीओ’महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावलेखळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मानअश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनातून क्रान्तिकारकांना अभिवादनराज्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरून महिलेची ४९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरांनी ५० वर्षीय महिलेची तब्बल ४८ लाख ६२ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ‘नुवामा प्लॅटफॉर्म’च्या नावाचा गैरवापर करून बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली.

‘मनी लॉन्ड्रिंग’च्या नावाखाली दोघांना गंडा; २१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गृहिणी असून सायबर चोरांनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर नुवामा प्लॅटफॉर्मच्या नावाने बनावट ट्रेडिंग अकाउंट उघडण्यास सांगण्यात आले. चोरांच्या सांगण्यावरून महिलेने विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले. ट्रेडिंगमधून मोठा नफा झाल्याचे भासवून आणखी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र, पैसे परत घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर रक्कम मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून संबंधित बँक खाती, मोबाइल क्रमांक आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची माहिती तपासण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×