Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

‘मनी लॉन्ड्रिंग’च्या नावाखाली दोघांना गंडा; २१ लाखांची फसवणूक

सीबीआय अन पोलिसांच्या नावाखाली तोतयांचा डाव

चतुःशृंगी आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाईची भीती दाखवून शहरातील दोघांची तब्बल २१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुःशृंगी आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक – सविस्तर बातमी

चतुःशृंगी परिसरातील ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आरोपींनी फोन करून आपण पोलिस असल्याचे भासवले. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून चौकशीच्या बहाण्याने त्यांच्याकडून १८ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे करत आहेत.

येवलेवाडी परिसरातील ५५ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी लक्ष्य केले. संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याचे सांगत त्यांना फोन करण्यात आला. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचे सांगून आरबीआयकडून चौकशी होणार असल्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर खात्यावर जमा झालेल्या पैशांची चौकशी करण्याच्या बहाण्याने संबंधित व्यक्तीकडून ३ लाख २० हजार रुपये उकळले. याप्रकरणी येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक करांडे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×