Breking News
हडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीलाबारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाहीपुण्यात ऐरोस्पेस मॉलमधील बारमध्ये रात्रभर डांगडिंग‘स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम…’दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या नावे ‘डीपफेक व्हिडीओ’महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावलेखळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मानअश्वारूढ तिरंगा यात्रा संचलनातून क्रान्तिकारकांना अभिवादनराज्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या नावे ‘डीपफेक व्हिडीओ’

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

महिलेची ४ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करुन फसवणुकीच्या घटना घडल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी बनावट व्हिडीओ तयार करुन महिलेची चार लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला आहेत. सोशल मीडियावर महिलेने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा बनावट व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओतील एक लिंक उघडल्यानतंर महिलेला सायबर चोरट्यांनी एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मधूमोहन नावाच्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने चार लाख नऊ हजार १०० रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×