Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना चंदननगरमधील विडी कामगार वसाहत परिसरात घडली. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरिअर बॉयनेच लुटले ९० लाखांचे दागिने – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुीसार, तक्रारदार महिला ७ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडली होती. चंदननगरमधील विडी कामगार वसाहत रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवाशाच्या खिशातील रोकड लंपास
पीएमपी प्रवाशाच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट स्थानकाच्या परिसरात घडली. याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शनिवारी (८ ऑगस्ट) स्वारगेट स्थानकाच्या परिसरात उतरले. कात्रज ते लोहगाव या मार्गावरील पीएमपी बसमधून ते प्रवास करत होते. चोरट्यांनी गर्दीत त्यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड लांबविली. पोलीस कर्मचारी ठाकरे तपास करत आहेत.

दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू

दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात नुकतीच घडली.
वैभव रघुनाथ गाडे (वय ५२, रा. पिंपळे गुरव) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी गंगाधर वाघलगावे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गाडे हे गेल्या महिन्यात २१ जुलै रोजी सिंहगड रसत्यावरील पानमळा परिसरातून सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकी घसरली. गाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×