Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चा

मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑगस्टपासून धरणे आंदोलन

marathinews24.com

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नव्याने स्थापन झालेल्या ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने आज समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

पुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी

या बैठकीत शिष्टमंडळाने बार्टी अधिछात्रवृत्तीच्या (BANRF) जागांची संख्या केवळ १०० न ठेवता ती किमान ६०० करावी आणि ३५ वर्षांची जाचक वयोमर्यादेची अट पूर्णपणे रद्द करावी, या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्यांची गांभीर्यपूर्वक दखल घेत आयुक्त दीपा मुधोळ मॅडम यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी निबंधक (बार्टी) यांच्या समवेत एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

शिष्टमंडळात प्रमुख नेत्यांचा समावेश समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मॅडम यांच्यासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेत ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या विद्यार्थी शिष्टमंडळाचे नेतृत्व आणि सहभाग राहुल डंबाळे, राहुल ससाने, अक्षय कांबळे, सिद्धार्थ ओव्हाळ, सुरेखा मेश्राम, प्रथमेश सूर्यवंशी आणि नितीन आंधळे यांनी केला. त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू अत्यंत प्रखरपणे प्रशासनासमोर मांडली.

१९ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
१२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बार्टी निबंधकांसोबतच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस आणि सकारात्मक निर्णय न झाल्यास, सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र येत १९ ऑगस्ट २०२६ पासून पुणे येथील समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर ‘बेमुदत धरणे आंदोलन’ करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संधींमधील भेदभाव आणि जाचक अटींविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने उतरणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×