Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाश

९ गुन्हे उघडकीस, ३७ लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – चोरी करताना पकडू जाउ नये, यासाठी केसांचा टोप लावून घरफोडी करणार्‍या आंतरराज्य सराईत टोळीला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १८ तोळे सोने, मोटार, घरफोडीचे साहित्य असा मिळून ३७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसीपी अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे उपस्थित होते.

पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी

शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्र्रसिंग जुनी (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर) रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय २६ रा. बडोदा, गुजरात) अक्षयसिंग उर्फ अक्षय बिरूसिंग जुनी (वय २२, रा. बिराजदारनगर, हडपसर) सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर (वय २२, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संबंधित सर्व आरोपी सराईत असून, त्यांच्याविरूद्ध प्रत्येकी ६ ते १२ गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांनी विश्रामबाग च्या हद्दीत घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरी केला होता. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास केला जात होता.

घरफोडीतील आरोपी मोटारीतून उंड्री पिसोळी परिसरातून जात असताना विश्रामबाग पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरून ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. विविध ठिकाणी घरफोडी केल्याचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. शंकरसिंग जुनी हा भारती विद्यापीठ, आंबेगाव, मार्केटयार्ड ठाण्यातंर्गत गुन्ह्यातील वॉटेंड आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, एपीआय उमेश कारके, उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी, सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशिकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार, नितीन बाबर यांनी केली.

ओळख लपवण्यासाठी केसांचा टोप, मास्कचा वापर

चोरी करताना पोलिसांना ओळख पटू नये, यासाठी सराईत चोरांकडून केसांचा टोप आणि मास्कचा वापर केला जात होता. तसेच घरांची रेकी करण्यासाठी आरोपी मोटारीतून फिरत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास कटावणीच्या मदतीने घराचे कुलूप उचकटून चोरी करीत. त्यानंतर चोरलेला ऐवज थेट गुजरातमध्ये नेत असल्याचे तपासात उघडकीस आले. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने चिकाटीने घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करीत आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

घरफोडी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांची उकल केली असून, ३७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

– कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×