Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरले

Crime News

कोंढवा रोडवरील गोकुळनगर चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार जेष्ठ महिलेचा पाठलाग करून चोरट्याने त्यांना पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने संबंधित १ लाख ८५ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ९ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास कोंढवा रोडवरील गोकुळनगर चौकात घडली आहे. याप्रकरणी उंड्री परिसरात राहणार्‍या ६८ वर्षीय महिलेने कोंढवा बुद्रूक येवलेवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वकील महिलेची ७० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला उंडी परिसरात राहायला असून, ९ ऑगस्टला दुपारच्या सुमारास गोकुळनगर चौकातून दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघाजणांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असून, चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तुमच्याकडील दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यानंतर जेष्ठ महिलेने गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवले. त्याचवेळी चोरट्यांनी हातचलाखीने १ लाख ८५ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नेवसे तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार चोरट्यांची टोळी अ‍ॅक्टीव्ह

पोलीस असल्याची बतावणी करीत नागरिकांना लुटणारी टोळी अ‍ॅक्टीव्ह झाली असून, प्रामुख्याने जेष्ठ नागरिक, महिलांना टारगेट करून अडवले जात आहे. त्यानंतर त्यांच्याकडील ऐवज पिशवीत काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने ऐवज लुटून नेला जात आहे. संबंधित दुचाकीस्वार चोरट्यांच्या टोळीने धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे संबंधित टोळीला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तरूणावर वार करून लुटले, आरोपीला अटक

तरूणावर वार करून त्याच्याकडील ६० हजारांचा मोबाइल हिसकावून नेणार्‍याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ८ ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वारगेटमधील जेधे चौकात घडली होती. अक्षय संजय जाधव (वय २५, रा. कैकाडी आळी, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भवानी पेठेत राहणार्‍या तरूणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण भवानी पेठेत राहायला असून, ८ ऑगस्टला स्वारगेट परिसरात ओळखीतील अक्षय जाधव त्याला भेटला. त्यावेळी त्याने १० हजार रूपये मागितले असता, तक्रारदाराने अक्षयला २०० रूपये आहेत, असे सांगितले. त्याच रागातून त्याने तक्रारदाराला शिवीगाळ केली. मारहाण करीत त्याच्याकडील ६० हजारांचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अक्षय जाधव याला अटक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×