Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

वकील महिलेची ७० लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन फसवणूक

marathinews24.com

पुणे – ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी एका ७० वर्षीय वकील महिलेची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका वकील महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकील महिला कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतून बोलत असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात ‘डिजिटल ॲरेस्ट’करण्यात येणार आहे, अशी धमकी त्यांना देण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात तीन दिवसांत वेळोवेळी ७० लाख रुपये जमा केले. चौकशी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चोरट्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×