कंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूक

कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

सायबर चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीतील कामकाजाविषयी समाज माध्यमात बनावट समुह (ग्रुप) करुन सायबर चोरट्यांनी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एरंडवणे भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामकाजाविषयी ‘वर्क ग्रुप चॅट’ या नावाने समाज माध्यमात बनावट समुह तयार केला. या समुहात कंपनीतील भागीदार असलेल्या संचालक महिला, तसेच कंपनीतील कर्मचाऱ्याला सहभागी करुन घेण्यात आले. त्यानंतर चोरट्याने कंपनीच्या बँक खात्यातील जमा रक्कमेची माहिती घेण्यात आली. त्यानतंर चोरट्याने त्याच्या खात्यात ४० लाख रुपयांचा धनादेश जमा करण्यास सांगितले. कंपनीच्या कामकाजासाठी रक्कम जमा करण्यास सांगण्यत आल्याने तक्रारदार कर्मचाऱ्याचा विश्वास बसला. धनादेश वटल्यानंतर चोरट्याच्या खात्यात ४० लाख रुपये जमा झाले. कंपनीतील संचालकांनी कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

डाॅक्टरांची ७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी एका डाॅक्टरांची सात लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका डाॅक्टरांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार ४६ वर्षीय डाॅक्टर येरवड्यातील महावीर सोसायटीत राहायला आहेत. त्यांचे एका खासगी बँकेत खाते आहे.

ऑनलाइन खरेदी व्यवहारांचे ॲप बँक खात्याला जोडण्यात आले आहे. चोरट्यांनी मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेऊन खात्यातून सात लाख २३ हजार रुपये दुसऱ्या एका बँक खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक नीलकंट जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×