धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा

खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पंकज जेम देवनूर (वय ५०, मूळ रा. मँचेस्टर, ब्रिटन), तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित राजू भोसले (वय ३१, रा. रामोशी गेट, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हरवलेले १४८ मोबाईल पोलिसांनी शोधून केले परत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे रिक्षाचालक आहे. गुरुवार पेठेतील प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरुंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदू देवदेवतांविषयी भ्रम निर्माण करण्यात आला. येशूचे नाव घेऊन धर्मगुरुने अंधश्रद्धा पसरविली. येशूमुुळे पाऊस पडतो, आजार बरे होतात’, असे धर्मगुरुने प्रवचनात सांगितले. नागरिकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी आकर्षिक केले‘, असे भोसले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

धर्मगुरुविरुद्ध परदेशी नागरिक कायदा कलम २०२५, तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६अन्वये संबंधित धर्मगुरुविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यात अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×