Breking News
फेरीवाल्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हागुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ९६ लाखांची फसवणूकमतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात दुरस्तीची बतावणीविवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवून आणलेमहाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसतिरंगा रॅलीने पुणे ठप्प, वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अडकलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थितीअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला वेगराष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथममार्कटयार्ड परिसरात महिलांचे दागिने हिसकावले

मार्कटयार्ड परिसरात महिलांचे दागिने हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

दुचाकीस्वार चोरटे सुसाट

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून, पादचारी महिलांसह जेष्ठांना लक्ष्य करीत लुटमार केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वार चोरट्यांना अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

डिजीटल अटकेची भीती, जेष्ठेला १२ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

मार्केटयार्ड परिसरात अवघ्या पाउण तासात दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले आहेत. या घटना ९ ऑगस्टला रात्री पावणे नउ ते सव्वा नउच्या सुमारास अलअमिन को.ऑप. सोसायटी, कुमारपार्क सोसायटी इमारतीजवळ घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दुचाकीस्वार चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जेष्ठ दाम्पत्य हे ९ ऑगस्टला रात्री नउच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरातील अलअमिन को. ऑप सोसायटीजवळून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याजवळ गाडी थांबवली. महिलेच्या गळ्यातील ७८ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. संबंधित दाम्पत्याने आरडाओरड करेपर्यंत चोरटे दिसेनासे झाले. तर दुसर्‍या घटनेत कुमारपार्क सोसायटीजवळ थांबवलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रात्री पावणेनउच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×