Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

डिजीटल अटकेची भीती, जेष्ठेला १२ लाखांचा गंडा

सीबीआय अन पोलिसांच्या नावाखाली तोतयांचा डाव

१२ लाख रूपये आरटीजीएस करायला सांगून फसवणूक

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगितले. याप्रकरणी डिजीटल अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला तब्बल १२ लाख रूपये आरटीजीएस करायला सांगून फसवणूक केली आहे. ही घटना ५ ते ६ ऑगस्टला वानवडीत घडली आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल आहे.

पुण्यात भाजी विक्रेता, पानटपरी चालकाकडून ३ पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वानवडीत राहायला असून, ५ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. पोलीस असल्याची बतावणी करीत, आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगितले. याप्रकरणी डिजीटल अरेस्ट करण्याचे वॉरन्ट आल्याचे दाखवून महिलेला भीती दाखवली. त्यांना सतत व्हिडिओ कॉल करून बँकखात्यातील १२ लाख रूपये आरटीजीएस करायला भाग पाडले आहेत.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बगाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×