Breking News
फेरीवाल्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हागुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ९६ लाखांची फसवणूकमतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात दुरस्तीची बतावणीविवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवून आणलेमहाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसतिरंगा रॅलीने पुणे ठप्प, वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अडकलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थितीअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला वेगराष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथममार्कटयार्ड परिसरात महिलांचे दागिने हिसकावले

मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात दुरस्तीची बतावणी

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा

ज्येष्ठाची केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फाॅर्म) त्रुटी राहिल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवून आणले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. तक्रारदाराच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. निवडणूक आयोगातील कर्मचारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात त्रुटी राहिल्याची बतावणी तक्रारदारांच्या वडिलांकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक एपीके फाईल पाठविली. एपीके फाईल उघडताच चोरट्यांनी मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जाेडण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्यातून चार लाख ९८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×