Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

कंपनीचा मालक असल्याचे सांगत करीत होता लुट

कंपनीचा मालक असल्याचे सांगत करीत होता लुट

इंदापूर तालुक्यातील आरोपीला बेड्या

marathinews24.com

पुणे – प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याची बतावणी करीत अनेकांना गंडा घालणार्‍या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने चंदुकाका सराफ ज्वेलर्समधून १०० ग्रॅम सोन्याची बिस्कीटे नेऊन अपहार केला होता. आरोपीला चंद्रपुरातून ताब्यात घेउन अटक करीत साडेआठ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. सिद्धार्थ देवीदास झेंडे (वय ३८ रा. म्हसोबावाडी, इंदापूर, पुणे )असे अटक केलेल्याचे नाव आहे.

फेरीवाल्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

चंदुकाका सराफ अ‍ॅड सन्स प्रा. लि. या चंदननगरमधील ज्वेलर्समध्ये ३ ते ४ ऑगस्टला सोने खरेदीच्या बहाण्याने १५ लाखांचे १०० ग्रॅम सोन्याची तीन बिस्कीटे एकाने नेउन फसवणूक केली होती. याप्रकरणी ज्वेलर्स ब्रॅन्च मॅनेजरने ६ ऑगस्टला चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाला प्राधान्य दिले. संबंधित आरोपी सिद्धार्थ झेंडे असल्याचे निष्पन्न झाले. तो चंद्रपुरात असल्याचे उघडकीस येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फसवणूकीतील सोन्याची बिस्किटे इंदापूरातील सराफाला विकून रोकड घेतल्याची कबुली दिली.

सोने विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी ८ लाख ५० हजार रूपये पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत. चोरी किंवा फसवणूक करताना आरोपी सिद्धार्थ झेंडे हा प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादित करीत होता. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, एसीपी सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक अमोल धस, एपीआय गणेश जगदाळे, रमेश मेमाणे, सचिन कदम, रामदास घावटे, किरण घुटे, प्रवीण भालचिम, माउली लहाणे यांनी केली.

अनेक जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक

आरोपी सिद्धार्थ झेंडे याने छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील विविध कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांसह महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी भिगवण पोलीस ठाणे, विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×