Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

Dog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावा

Dog Attack

मालकिणीविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – लॅब्रेडोर जातीच्या पाळीव कुत्र्याने १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावा (Dog Attack) घेतल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २६ सप्टेंबरला वडगाव शेरी भागात घडली. जखमी झालेल्या मुलाच्या चेहर्‍याला आठ टाके पडले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले. प्रकरणी श्वान मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्णव विनोद ढुमणे (वय १२ रा. वडगाव शेरी) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील विनोद (वय ४२) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्वान मालकिण तपस्विनी कुणाल शिंदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढुमणे कुटुंबीय वडगाव शेरीतील शिंदे बिल्डींगमध्ये राहायला आहे. २६ सप्टेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्णव घरातून बाहेर पडला. शेजारी राहणार्‍या महिलेने लॅब्रोडर जातीचे श्वान पाळले आहे. घरातून बाहेर पडलेल्या अर्णववर पाळीव श्वानाने झेप घेउन अर्णवच्या चेहर्‍याचा चावा (Dog Attack) घेतला. श्वानाच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या चेहर्‍याला आठ टाके पडले असून, रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पाळीव श्वानाला सुरक्षितरित्या बांधून न ठेवणे, तसेच आवश्यक ती काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्वानाच्या देखभालीत निष्काळजणीपा दाखविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस फौजदार लिंगण्णा तपास करत आहेत. दरम्यान, शहरात पाळीव श्वानाकडून चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. श्वान मालकांनी सुुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×