Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

९ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – गांजा विक्री करणार्‍यासह पुरवठा करणार्‍यांचा काळेपडळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून, (Pune Crime News) त्यांच्याकडून एक किलो गांजा, साडेआठ लाखांची मोटार, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे. पुरवठादार टोळीविरुद्ध कोथरुड, यवत, वानवडी, भिंगार पोलीस ठाण्यातंर्गत विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ४० रा. काळेपडळ, हडपसर) विजय राजू हुबळीकर (वय २९) बबन बाबुराव दांडगे (वय ३९) अशोक उर्फ अक्षय सतीश जाधव (वय २८) साहिल सुभाष ठोंबे (वय २७) विकास संदीप बोदडे (वय २०) यांना अटक केली आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांचा सुळसुळाट – सविस्तर बातमी

काळेपडळ पोलिसांचे पथक २१ सप्टेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार विशाल ठोंबर, महादेव शिंदे, नितीन ढोले, गिरीराज जगदाळे यांना एसआरपीएफ मैदानाजवळ एकजण संशयित थांबल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळताच पथकाने योगेश अडसुळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो ४४ ग्रॅम गांजा जप्त केला. दरम्यान, याप्रकरणाचा तपास एपीआय अमित शेटे करत असताना गांजा पुरवठादारांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी इतर पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल, मोटार असा ऐवज जप्त केला.

Pune Crime News गांजा तस्करी करणार्‍या पाचही आरोपीविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, संबंधित आरोपींनी आणखी कोठे गांजाची तस्करी केली आहे का, यांची साखळी कुठपर्यंत आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही कामगिरी उपायुक्त जीवन बेनीवाल, एसीपी अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर, एपीआय रत्नदीप गायकवाड, एपीआय अमित शेटे, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, नीलेश देसाई, विशाल ठोंबरे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, प्रदीप बेडीस्कर, अमोल जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×