महिलांसह पुरुषांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी विसर्जन मिरवणुकीत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला आहे. मंगळसूत्र, सोन्याची चैन (Ganesh Visarjan Theft) असा मिळून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटना २५ सप्टेंबरला दिवसभरात अप्पा बळवंत चौक, अलका टॉकीज चौक, बुधवार पेठ परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टोन क्रशरमध्ये अडकून अल्पवयीनाचा मृत्यू – सविस्तर बातमी
गणेश विसर्जन मिरवणूक पाहिल्यानंतर गर्दीत रस्त्याने घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना २५ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास अप्पा बळवंत चौक ते नू.म. वि शाळा बाजीराव रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Ganesh Visarjan Theft) त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार नलावडे तपास करीत आहेत. तर दुसर्या घटनेत चोरट्यांनी अलका टॉकीज परिसरात झालेल्या गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील १ लाख ५९ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २५ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून, सिंहगड रोड परिसरात राहणार्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरात गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी चोरुन नेली आहे. ही घटना २५ सप्टेंबरला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमलदार मोरे तपास करीत आहेत. दरम्यान, एकीकडे मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही, चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याच्या घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बस मध्ये शिरताना जेष्ठची सोन्याची बांगडी चोरीला
पीएमपीएल बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील २ लाख १० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली आहे. ही घटना २४ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दांडेकर पुल परिसरात घडली आहे. याप्रकरणी कर्नाटकमध्ये राहणार्या जेष्ठेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिला मूळच्या कर्नाटकातील असून, कामानिमित्त त्या पुण्यातील नातेवाईकांकडे आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल राउत तपास करीत आहेत.




















