Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Stone Crusher Accident : स्टोन क्रशरमध्ये अडकून अल्पवयीनाचा मृत्यू

Pune Drainage Pit Accident

लोणीकंद परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – स्टोन क्रशरमध्ये (खडी मशीन) अडकून एका १७ वर्षीय कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. (Stone Crusher Accident) अल्पवयीनाला कामावर ठेऊन त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी स्टोन क्रशर मालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

पुण्यात रिक्षा चालकाला दगडाने मारहाण; गु्न्हा दाखल – सविस्तर बातमी 

साईराम स्टोन क्रशरचे मालक दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०, रा. साईसमृद्धी अपार्टमेंट, वाघोली, अहिल्यानगर रस्ता), सत्यजीत अशोक जाना (वय ३५, रा. स्पंदन स्पर्श सोसायटी, वाघोली, अहिल्यानगर रस्ता), अमित भगवान अकोलकर (रा. व्हिजन प्रिसा अपार्टमेंट, रावेत, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार अजित कुऱ्हे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद भागात साईराम स्टोन क्रशर आहे. तेथे प्रिन्स धुर्वे काम करत होता. धुर्वे हा अल्पवयीन होता. त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेण्यात येत होते. १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्टोन क्रशर यंत्रात अडकून धुर्वे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Stone Crusher Accident उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्टोन क्रशरच्या मालकांनी धुर्वे याला सुरक्षाविषयक साधने पुरवली नसल्याचे चौकशीत उघड झाले. अल्पवयीनाकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×