Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime : पुण्यात रिक्षा चालकाला दगडाने मारहाण; गु्न्हा दाखल

पुण्यात रिक्षा चालकाला दगडाने मारहाण; गु्न्हा दाखल

डेक्कन जिमखाना परिसरातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल, एकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – (Pune Crime) शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना भागात किरकोळ वादातून रिक्षा चालकाला अडवून भररस्त्यात दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. रिक्षा।चालकाला दगड फेकून मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सोशल मीडियावर याबाबतची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अनिल लक्ष्मण डिकुळे (वय ३८, रा. रामनगर पोलीस चौकीसशेजारी, वारजे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपी बसची मंडळाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला धडक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रिक्षाचालक डिकुळे हे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्त्याने निघाले होते त्यावेळी रिक्षात एक महिला प्रवासी होती. आरोपी तरुणाने रिक्षा अडविली आणि रिक्षात बसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रिक्षाचालक डिकुळेने त्याला रिक्षात महिला प्रवासी असल्याचे सांगितले. या कारणावरुन आरोपी तरुणाने वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली. (Pune Crime) रस्त्यात पडलेला दगड उचलून डिकुळे यांना फेकून मारला. दगडाने त्यांना मारहाण केली. डिकुळे यांच्या भुवईजवळ दुखापत झाली. त्यांचा दात तुटला. आरोपीने रिक्षाच्या काचेवर दगड फेकून मारला. रिक्षाची काच फुटून दर्शनी भागाचे नुकसान झाले. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंतरकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×