Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

PMP Bus Accident : पीएमपी बसची मंडळाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला धडक

Pune Road Accidents

३ कार्यकर्ते जखमी

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसने मंडळाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला धडक (PMP Bus Accident) दिल्याची घटना मंगळवार पेठेतील लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल चौकात (मालधक्का) घडली. अपघातात ट्राॅलीत बसलेले मंडळाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी पीएमपी बस चालक शिवा गजानन धोत्रे (वय २६, सध्या रा. लोणीकंद, पुणे अहिल्यानगर रस्ता, मूळ रा. उकळी पेन, जि. वाशीम) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखळीपीर तालीम मंडळाचे पदाधिकारी शिवराज रवींद्र माळवदकर (वय २७) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार; सफाई कर्मचार्‍याला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर साखळीपीर तालीम मंडळाची ट्रॅक्टर ट्राॅली मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे निघाली होती. संगम पार्कसमोर भरधाव पीएमपी बसने ट्रॅक्टर ट्राॅलीला पाठीमागून धडक (PMP Bus Accident) दिली. अपघातात ट्राॅलीत बसलेले कार्यकर्ते कुणाल सुरेश पवार (वय २२), धनराज अतुल आवटे (वय २२), सौरभ प्रकाश तोंडे (वय २४) यांना दुखापत झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×