डॉक्टरांच्या माहितीने अत्याचाराचा प्रकार उघडकीस
marathinews24.com
पुणे – शहरातील विश्रांतवाडी परिसरात राहणार्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५२ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १२ सप्टेंबरला घडली आहे. (Vishrantwadi POCSO Case) याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीवेळी डॉक्टरांच्या माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. जयसिंग भानुदास साठे (वय ५२, रा. कामगारनगर,विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे.
पुण्यातील शनिवार पेठेत घरफोडी; ३० लाखांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी परिसरातील एका रुग्णालयात २२ सप्टेंबरला महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी मुलीला तपासले असता, तिच्यावर १२ सप्टेंबरला लैिंगक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात माहिती कळवली. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला. आरोपी साठे याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७४, ३५१(२) तसेच पोक्सो (Vishrantwadi POCSO Case) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, दोघीचाही पुरवणी जबाब विश्रांतवाडी पोलिसांनी नोंदवला आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्ह्यात बीएनएस कलम ६५(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि १२ वाढविले आहेत. याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येत आहे. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याने मुलीला जाळ्यात कसे अडकवले, याचा तपास केला जात आहे.
नातलगांचा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Vishrantwadi POCSO Case अल्पवयीन मुलीवर सफाई कर्मचार्याने १२ सप्टेंबरला लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या नातलगांसह इतर नागरिकांकडून विश्रांतवाडी परिसरासह पोलीस ठाण्यालगत रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.




















