विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरात गणेश विसर्जनच्या दिवशी शनिवार पेठेतील एका सोसायटीतील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. (Shaniwar Peth Burglary) याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूबंदी आदेश झुगारून बार सुरू; चालकावर गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटुंबीयांसह शनिवार पेठेतील हसबनीस बखळ येथे एका सोसायटीत राहायला आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास ते एका नातेवाईकांकडे गेले होते. विसर्जनाचा कार्यक्रम आटोपून ते शनिवारी पहाटे परतले. (Shaniwar Peth Burglary) तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. तक्रारदारांनी सदनिकेची पाहणी केली. तेव्हा शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी ३० लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती विसर्जन बंदोबस्तातील पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक साईकुमार कारके तपास करत आहेत.




















