Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Koregaon Park Bar Case : दारूबंदी आदेश झुगारून बार सुरू; चालकावर गुन्हा

कोरेगाव पार्कमध्ये ‘स्पीक लो’मध्ये मद्यविक्री

कोरेगाव पार्कमध्ये ‘स्पीक लो’मध्ये मद्यविक्री

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशीच्या) दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश असतानाही कोरेगाव पार्कमधील बार सुरू ठेवून मद्यविक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. लेन क्रमांक पाचमधील ‘स्पीक लो’ रेस्टॉरंट अँड बारमध्ये (Koregaon Park Bar Case) मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी बार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद सूर्यभान बावके (वय ३९, रा. फोरच्युन रेसृष्टी, बी/६०४, येवलेवाडी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ७७ (ब) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये कारवाई केली आहे. पोलिस अंमलदार ओंकार अरुण ताड यांनी तक्रार दिली आहे.

मुख्यमंत्री साहेब, आम्हाला अधिकारी व्हायचंय, आम्हाला शिक्षक द्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद (Koregaon Park Bar Case) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे-१ कार्यक्षेत्रातील एफएल-२, एलएल-३, सीएल-३ आणि एफएलबीआर-२ प्रकारच्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तींना हा आदेश लागू होता.

Koregaon Park Bar Case गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरेगाव पार्कमधील ‘स्पीक लो’ रेस्टॉरंट अँड बारमध्ये आदेशाची अंमलबजावणी न करता मद्यविक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मद्यविक्रीचा परवाना आणि त्यातील अटी-शर्तींचेही उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर बार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित व्यक्तीस भारतीय न्याय संहितेतील कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×