Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रोडवरील बँकेत आग, कागदपत्रे, संगणक जळाले

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आगीत महत्वाची कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन सह कार्यालयात पुर्णपणे जळून (Pune Fire News) खाक झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नसून, सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले.

फ्लॅटचे कुलूप तोडून १५ लाख रुपयांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी

बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार फायर ब्रिगेडने तत्काळ सात गाड्या घटनास्थळी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. चौथ्या मजल्यावर बँकेतील अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, खुर्च्या टेबलसह महत्वाचे साहित्य आगीत जळून खाक झाले (Pune Fire News) आहे. दरम्यान, या आगीत चलनातील काही नोटा जळाल्या की नाही, याची खात्री होऊ शकली नाही. याप्रकरणी संबंधित बँकेकडून रात्री उशिरापर्यंत काहीही खुलासा केला नाही.

कार्यालयातील एसी सुरु केल्यानंतर आग लागल्याचे उघडकीस आले. यावेळी कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर एक्सटिंशरचा वापर केला. मात्र, आग वाढत गेल्यानंतर त्यांनी अग्निशमक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीचे रौद्र रुप धारण केले होते. सुरुवातीला पथकाने पाण्याचा मारा करुन आग विझवण्यास प्राधान्य दिले. कार्यालयात कोणीही अडकले नसल्याची खात्री केली. अखेर सव्वा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवून, कुलिंगचे काम करण्यात आहे. या कामगिरीत ३५ ते ४० जवानांनी सहभाग घेतला होता. अग्निशमकचे मुख्य फायर अधिकारी गणेश सोनुने, स्टेशन ड्युटी ऑफिसर पंकज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आग विझवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×