सोन्याच्या दागिन्यांसह १५ लाखांचा ऐवज चोरीला
marathinews24.com
पुणे – Pune House Burglary : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून १५ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कोंढवा परिसरातील उंड्री, लोहगाव, तसेच लोणी काळभोर परिसरात या घटना घडल्या. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिस्तूल रोखून तरुणाला मारहाण; गुलटेकडीतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे उंड्री-पिसोळी परिसरातील सुलई विहार सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री बंद सदनिकेचे कुलूप तोडले. Pune House Burglary कपाटातील ७ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत. तर लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी तक्रारदाराच्या घराचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत. लोणी काळभोर भागातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे लोणी काळभोरमधील मोगले वस्ती परिसरात राहायला आहेत. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ऐवज चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.
दुकानाचे कुलूप तोडून तीन लाखांची रोकड चोरीला
गुरुवार पेठेतील एका भांडी विक्रेत्याच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख २० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरात तक्रारदाराचे प्रशांत मेटल्स हे भांडी विक्रीचे दुकान आहे. Pune House Burglary विसर्जनामुळे दुकान बंद होते. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जऱ्हाड तपास करत आहेत.






















