Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Crime : पिस्तूल रोखून तरुणाला मारहाण; गुलटेकडीतील घटना

Pune Crime

बांबूने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

marathinews24.com

पुणे – Pune Crime : प्रतिस्पर्धी गटातील तरुणांशी मैत्री असल्याच्या कारणावरुन तरुणावर पिस्तूल रोखून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सनी खंडू म्हात्रे (वय १९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रसाद जाधव, कृष्णा जाधव, साथीदार लाडू, गणेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास सनी म्हात्रे हा मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. प्रतिस्पर्धी गटातील तरुणांबरोबर का फिरतो ? अशी विचारणा आरोपींनी केली. सनी याच्यावर पिस्तूल रोखून आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली. सनी याला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

खासगी कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Pune Crime  खासगी कार्यालयाचा दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन परिसरात घडली. याबाबत व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे पर्वती दर्शन परिसरातील मुक्तांगण शाळेसमोरील एका इमारतीत कार्यालय आहे. चोरट्यांनी कार्यलयाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×