चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय
marathinews24.com
पुणे – धारदार शस्त्राने गळा चिरून दोन महिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील शेरेवाडी गावात सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. इंदुमती मारुती लाडकट आणि कृष्णाबाई कुंडलिक लाडकट अशी हत्या (Baramati Double Murder) झालेल्या महिलांची नावे आहेत. इंदुमती या बाबूर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. मंगळवारी सकाळा दुहेरी हत्या उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशाने महिलांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात लक्ष्मी रोडवरील बँकेत आग, कागदपत्रे, संगणक जळाले – सविस्तर बातमी
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुमती घरात एकट्या राहत होत्या. त्यांचा मुलगा कामासाठी परदेशात कामाला आहे. तर कृष्णाबाई शेजारी राहायला असून, अनेकदा इंदुमतीच्या घरी झोपायला जात होत्या. सोमवारी (दि. २८) रात्री त्या दोघी घरात झोपल्या होत्या. रात्री उशिरा, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून दोघींवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांचे गळा चिरुन खून केला.
Baramati Double Murder : पोलीस तपासात उघडकीस आले आहे की, हल्लेखोरांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. सुरवातीला महिलांनी प्रतिकार केल्यानंतर चोरट्यांची त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मंगळवारी सकाळी हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घराचे दरवाजे आणि कपाटे उघडी दिसून आली आहेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांशिवाय घरातून आणखी किती दागिने चोरीला गेले आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.























